वंजारी समाजाच्या इतिहासावर जावेद मणियार (नागपूर) यांनी लिहलेला लेख अवश्य वाचा, व्हायरल करा, समाजातील पुढारी,अधिकारीपर्यंत हा लेख जाऊ द्या* 👇
*मागच्या महिन्यात रमजान ईदनिमित्त मी माझ्या मुळगावी पाथर्डीला गेलो होतो. तेव्हा जवळजवळ ३५० वर्षापूर्वी वंजारी समाजाच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असलेल्या आद्यराजे नरवीर शूरयोध्दे 'बागोजीराजे प्रतापराव गर्जे' यांची समाधी असलेल्या 'नागझरी' आताचे 'मोराळा' ता.आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी भेट दिली. व तिथला ज्वलंत व शौर्याचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी सोबत बागोजीराजेंचे तेरावे वंशज नागनाथ राजे गर्जे होते.अनेक महिन्यांपासून तिथे भेट देण्याची राहीलेली इच्छा पुर्ण झाली. इतिहास समजून घेणे तेवढे सोप्पे काम नसते. इतिहास सतत आपल्याला शिकवत असतो, फक्त शिकायची तयारी आणि मन व मेंदू उघडे असायला हवे.*
*नागझरीला जाताच क्षणी अगोदर किल्ल्याच्या एका बाजूला लवणात काट्या कुपाट्यात, धूळ, ऊन, वारा खात खितपत पडलेली कमनिय व भव्य अशी आकर्षक दगडी छत्रीची महान योद्धे 'बागोजीराजे' यांची समाधी नजरेस पडली. एका शेतातून ढेकळ तुडवत आम्ही समाधीजवळ पोहचलो. तिकडे सध्या कोणीही फिरकतही नाही, अशी परिस्थिती समाधीची अवस्था पाहून वाटेल. ज्या बागोजीराजेंनी वंजारी समाजाच्या शौर्याचा इतिहासाचा झेंडा रोवला अशा महान योद्ध्याच्या* *समाधीची अशी दुरावस्था पाहून संताप आला. या शुरांच्या जाज्वल्य इतिहासाच्या होत असलेल्या अवहेलनेला प्रथमतः वंजारी समाज जबाबदार आहे का ? अन्य कोणी ? असा प्रश्न मनात निर्माण झाला जो आतापर्यंत पण जश्याच्या तसा आहे. याचे संदर्भासह कोणीतरी उत्तर देईल अशी आशा मला आहे. यावेळी आद्य राजे बागोजींनी बांधलेल्या व आता शेवटच्या घटका मोजत असलेल्या किल्ल्याची अंतर्गत व बाह्य पाहणी केली. किल्ल्याचे प्रवेशद्वार, धान्याचे कोठार,चार* *बुरुजे ,दर्शनी भाग, शस्रांस्त्राची भूयारे ,संकटकालीन भूयारी मार्ग व तट पाहून त्या काळातील वंजारी राजे गर्जे राजेंचा राजेशाही थाट लक्षात येतो. अशीच गढी हातोला,पाटसरा येथे होती.यावेळी बागोजींचे नव्वदी ओलांडलेले वंशज निळकंठराव व शामराव तसेच सूर्यकांतराव यांची भेट घेत इतिहास जाणून* *घेण्याचा प्रयत्न केला.*
*यवन आक्रमणांना नेहमीच त्रस्त होत असल्यामुळे राजस्थान राज्यातून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेला वंजारी समाज व्यापार करत असे. राजस्थान मध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रतापसिंग यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता. राजस्थानात असतांना वंजारी समाज कडवा लढवय्या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुक तसेच मालपुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे.महाराष्ट्राचे* *आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात वेगवेगळ्या समाजाच्या लोकांचा भरणा होता हे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले आहेच.यांत रामोशी, महार,मांग,चांभार,न्हावी,साळी,माळी,धनगर,ब्राम्हण,कुंभार,कुणबी,आदिवासी,मुस्लीम असल्याचे शिकलो,परंतु शूरवीर असणाऱ्या वंजारी समाजाची देखील माणसं होती. याची कागदोपत्री माहिती राजस्थानातील वंशावळीकार (भाट) यांचेकडे आजही आहे.* *तत्कालीन इतिहासकारांनी देखील वंजारी समाजाच्या या शौर्याच्या इतिहासाला अंधारात ठेवले,हे तितकेच खरे आहे.का नाही प्राथमिक शाळेत ,माध्यमिक शाळेत व महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना पुस्तकांत ७०० वर्षापासून शूरविर असलेल्या या समाजाच्या शूरवीर राजांचा एकही धडा आढळून आला नाही ?परंतु ही वस्तूनिष्ट माहिती* *भाटांकडे आहे.तसेच ब्रिटीशांच्या गॅझेटमध्ये तसेच काही अधिकृत ग्रंथात त्याचे उल्लेख आहेत. भाट म्हणजेच वंशावळीकार राजस्थानातील असून तेही जातीने वंजारीच आहेत. दोन तीन वर्षाला ते या भागात येत असतात. वंजारी समाजातील बागोजींराजेंच्या पूर्वजांपासून ते राजे* *अहिलाजीराव प्रतापराव गर्जें पर्यंत ( नागनाथ राजे गर्जे यांचे आजोबा ) या राजे घराण्याचा मोठा डंका होता. हे अनेक वस्तूनिष्ट पुराव्यांवरून सिद्ध होते. बीड जिल्हा व अहमदनगरच्या मध्यावर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील नागझरी आताचे नाव मोराळा या गावी त्यांची राजधानी होती. संपूर्ण बीड जिल्हा व अहमदनगरचा काही* *भाग हे या जहागिरीचे कार्यक्षेत्र होते. तर राज्यातील संपुर्ण वंजारी समाजाचे न्यायदानाचे काम नागझरी संस्थानातूनच चालायचे. जहागिरी ही त्या काळात फक्त उंच वर्गाच्या व कर्तबगार लोकांनाच देण्यात येई. हा* *अलिखित नियम त्याकाळीही होता.भारतात कित्येक जहागिऱ्या होत्या व त्या कर्तबगार व मोठ्या घराण्यांना देण्यात आल्या त्यापैकीच वंजारी समाजाचे हे एकमेव गर्जे राजे घराणे होय.*
*रयतेचे परकीय शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी व रयतेला हक्काचं, न्यायाचं आणि सुखाचं स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न मनी धरलं होते. एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र ठेवलेली जी माणसे महारांजाभोवती होती त्यात अगदिच सुरूवातीपासून जे होते त्यांपैकी बागोजी देखील होते.निधड्या छातीचे बागोजी* *वतनदारी पेक्षा स्वराज्य महत्त्वाचे मानणारे एक निष्ठावान सरदार होते. प्रसंगी स्वराज्यासाठी वतनदारी, घर-दार सोडायला देखील ते तयार होते. प्रतापगड आक्रमणावेळी त्याकाळी बागोजींनी घोडदळाची मदत केली होती. जेव्हा विजापूरी सरदार असणारा बलाढ्य व गर्विष्ट विचाराचा अफजलखान मारला गेला तेव्हा इशाऱ्याची तोफ डागणाऱ्यांत बागोजींही* *होते. जेव्हा छत्रपतींनी* *अफजलखानाचा कोथळा बाहेर आला होता,तेव्हा प्रतापगडाला आदिलशही सैन्याचा विळखा होता. शिवरायांचे सैन्य मोठ्या आतुरतेने इशाऱ्याची वाटच पाहत होते. तोफेचा आवाज झाला.परिसर हादरला,आवाज होताच गर्ददाट झाडीत लपून राहिलेले आपल्या महाराजांचे सैन्य अफजलखानाच्या बेसावध फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बिथरल्या त्यांना नेमके वरती काय झाले हेच समजेना. "कुछ तो बुरा हुवा है " इतक तर त्यांना समजून उमजल.त्यांना पळायलाही वाटा सापडत नव्हत्या. खानाच्या सैन्याची दाणादिन उडाली.अखेर आनंद जाहला. प्रतापगडाचे युध्द झाल्यावर युद्धात कामी आलेल्या व पराक्रम गाजवलेल्या सर्वांनाच शिवाजी महाराजांनी मानाची बक्षिसे आणि मदत दिली.पराक्रम गाजवणाऱ्या बागोजीराजेंना ' प्रतापराव ' हा किताब दिला.यानंतर बागोजींच्या स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या सर्वच वंशजांच्या नावासमोर प्रतापराव हि पदवी वापरली गेली. स्वातंत्र्यानंतर लोकशाही आली तरिही या घराण्याच्या वारसांना* *आजही राजे हा शब्द वापरला जातो. सायकलीच्या चाकाएवढ्या ताम्रपटात अस्सल मोडी लिपित लिहलेल्या या किताबाला नंतरच्या इंग्रजकाळात जप्त करण्यात आला. बागोजींचे पुर्वज हेही मुघल सम्राट अकबर बादशाहकडे एक हजार सैन्यासह नोकरीस होते. तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने बादशहाकडून 'धर्माधिकारी' ही पदवी मिळवली* .
*बागोजींनंतर त्यांचे वंशज आबाजी प्रतापराव व त्यानंतर धर्माजी प्रतापराव यांनी जहागिरीचे उत्तमरित्या व बागोजींसारखे जहागिरीचे काम पाहिले. बीड व अहमदनगर जिल्ह्यातील भुभागावरील खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले धर्माजीराजे न्यायदानातही उत्तम होते.कोणत्याही प्रकारचे तंटे सोडविण्यात त्यांचा हातखंड होता. वंजारी समाजातील राज्यभरातील तंटे सोडविण्यास ते घोड्यावर प्रवास करित असे.५ मृत्यूदंडापासून ५ फटके सजा देण्याची त्यांना मुभा होती. राजा म्हणजे सर्व सत्तेचे अधिष्ठान असल्यामुळे ती सत्ता कायद्याने म्हणजे नियमाने न वापरता निरपराध्यांना शासन न करणे आणि अपराध्यांना क्षमा न करणे हे न्याय्य होय. अशा जाणिवेने अचूक रितीने वंजारी राजे धर्माजी प्रतापरावांनी जहागिऱ्या* *सांभाळून जनतेची सेवा केली. राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांनी मराठवाड्यात निजामाला तर अहमदनगर जिल्ह्यात ब्रिटीशांना ३० वर्षे सळो की पळो करून सोडले. धर्माजी प्रतापराव गर्जे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य आद्य क्रांतिकारक होते आपण भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वाचताना मंगल पांडे च्या पिस्तूलातून पहिली गोळी सुटली आणि भारतीय स्वातंत्र्ययुध्दाची ठिणगी पडली.१८५७ चा राष्ट्रीय उठाव झाला आणि स्वातंत्र्य युध्दाला* *सुरूवात झाली अशी माहिती आपल्याला मिळते परंतू १८५७ च्या राष्ट्रीय उठावाच्या अगोदर ३९ वर्षे म्हणजे इ..स.१८१८ ला नागझरी संस्थानचे राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांनी ब्रिटीश व निजाम सत्तेविरूद्ध पहिले राष्ट्रीय जंग पुकारले व ज्या प्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई "मैं मेरी झाशी नही दूंगी" अशी गर्जना करत इंग्रजाशी तळपत्या विजे प्रमाणे लढल्या. त्याचप्रमाणे आद्यक्रांतीकारक राजे धर्माजी प्रतापराव गर्जेनी "आम्ही राजे* *आहोत मांडलिक नव्हे" अशी गर्जना करून इंग्रज व निजाम सत्तेविरूद्ध मोठे जंग पुकारले व त्यांना सळो की पळो करून सोडले. आणि म्हणून आद्यक्रांतिकारक राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांचा शौर्य पराक्रमाचा इतिहास राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे.परंतु हा चिकीत्सक इतिहास या वंजारी* *समाजाला समजावा अशी वेळ सध्या तरी दिसत आहे. धर्माजींची शरीरयष्टी धिप्पाड होती.व ते तितकेच शौर्यवानही होते. निजामांच्या विरुद्ध राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांनी युद्ध पुकारले होते.” आम्ही राजे आहोत, मांडलिक नव्हे “ अशी गर्जना करुन इंग्रज व निजाम यांना सळो कि पळो करून सोडत त्यांनी निजामांसमोर मोठे आव्हान उभे केले. निजामाचे सैनिक बीड जिल्ह्याच्या* *आसपास देखील फिरकत नव्हते. इतकी दहशत व वचक राजे धर्माजी प्रतापराव गर्जे यांनी निजाम सत्तेविरुद्ध निर्माण केली होती. निजाम आणि इंग्रजांनी एकत्रित येऊन १८१८ मध्ये आक्रमण केले त्या लढाईत हा वंजारी वाघ मोठ्या शौर्याने व पराक्रमाने लढला. या युद्धात निजाम, इंग्रज यांचे मोठ्या प्रमाणात सैन्य धारातीर्थं पडले परंतु दोन शक्ती* *एकत्र आल्यामुळे धर्माजी प्रतापराव गर्जे यांनी माघार घेतली. धर्माजींना अहमदनगरला आणले गेले व तिथे तह झाला.या तहात इतर समाजाचे राजेपद काढून फक्त महाराष्ट्रातल्या वंजारी जातीपुरते राजेपद अबाधित ठेवण्यात आले.१८१८ च्या युद्धात धर्माजी राजेंचा युद्धातील जोश पाहून ब्रिटिश लेफ्टनंट स्टूथरलॕनड या* *अधिकाऱ्याने त्यांचे वर्णन करतांना सांगितले कि, धर्माजी प्रतापराव यांचा आवेष इतका बेफाम होता कि, त्यांनी तलवारीच्या एका वारात निजाम सैन्याचे शीर धडावेगळे केले. तर शत्रू सैन्याची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेलीच बरी.या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या या टिप्पणीवरून धर्माजींची धमक लक्षात आली असेलच.....*
*धर्माजींनंतर दुसरे बागोजी प्रतापराव यांनी निजामकाळात जनतेला त्रास देणाऱ्या जवळजवळ ७०० उंच ,बलवान व धिप्पाड अफगाणी रोहिल्यांना यमसदनी धाडले.बीड व धाराशीव जिल्ह्यात या रोहल्यांनी सर्वसामान्य जनतेला त्रास दिला,यामुळे निजामही हैरान झाला होता.परंतु बिन दवा कि बिमारी गयी या शब्दप्रयोगानुसार तो आनंदला.सर्वसामान्य जनतेला त्रास देणारे,महिलांचे अब्रू लुटणारे रोहिले मारले गेले म्हणून निजामाने शाही दरबारात बोलावून दुसरे बागोजी प्रतापराव गर्जेंचा मोठा सन्मान केला व पैठणची जहागिरी त्या* *मोबदल्यात दिली,परंतू ती त्यांनी नाकारली.याला कारणही तसेच होते.मांडलिकाच जीण न जगणारे हे जहागिरदार घराणे होते. यानंतर दुसरे धर्माजी प्रतापराव, नवसाजी प्रतापराव, सोनाजी प्रतापराव, त्रंबकराजे प्रतापराव यांनी जहागिरीचे पुर्वजांना पुरक असे काम पाहिले काम पाहिले. नंतरच्या काळात बागोजीराजे प्रतापराव तिसरे, रघूनाथराव प्रतापराव, भुजंगराव प्रतापराव , काकासाहेब प्रतापराव आहिलाजीराव उर्फ रावसाहेब* *प्रतापराव यांनी पुर्वजांप्रमाणे न्यायदानासह जहागिरी सांभाळली. बागोजीराजेनंतर आहिलाजीरावांचे अफाट काम पाहून इंग्रजांनी त्यांना 'रावबहादूर' हा किताब दिला होता. इंग्रजांकडून रावबहादूर किताब मिळवणे तेवढे सोप्पे त्याकाळी नव्हते.राजा हा सर्व प्रजेचे रक्षण करणारा आणि कायद्याने राज्य करणारा, कायद्यापुढे सर्वांना मानणारा असेल, तरच तो खरा राजा होय, असे मानले जाते. दुर्बलांचे सबळांपासून रक्षण करणे, हे राजाचे पहिले कर्तव्य होय. तो निःपक्षपाती असावा* *लागतो. त्याच्या मध्ये आपपरभाव असता कामा नये.ही सर्व गुणे या वंजारी समाजाच्या आद्य असलेल्या गर्जे खानदानात होती.*
*याच वंजारी समाजातील क्रांतिकारी संत भगवानबाबांना नारायण गडावर समाजकंटकांनी जेव्हा भयंकर व कपटी वृत्तीचा त्रास दिला म्हणून त्यांना नारायण गडावरून पायउतार व्हावे लागले होते, तेव्हा बागोजींचे वंशज भुजंगराव प्रतापराव गर्जे यांनी अखिल वंजारी समाजाची 'नागतळा 'येथे परिषद बोलावली होती. त्या परिषदेला महाराष्ट्रातील वंजारी समाजातील मोठी नामवंत मंडळी उपस्थित होती.अन्याय झालेल्या* *ऐश्वर्यसंपन्न भगवानबाबांना देखील यावेळी नागतळ्याला उपस्थित होते.य बैठकीत अनेक खलबते झाली.यातून समाजकंटकानी भगवानबाबांना अपमानास्पद त्रास दिला असे त्यावेळी निष्पन्न झाले तेव्हा भुजंगराजे चवताळले अशा समाजकंटकांवर शस्त्रास्त्र कारवाई करण्याचा निर्णय भुजंगराव प्रतापराव यांनी सुनावला. परंतु भगवानबाबांनी* *शांततेतूनच व अहिंसेतून हा विषय मार्गी लागावा असे बैठकीत सांगितले . अशाच प्रकारे शौर्य व न्यायदानात हातखंडा असलेल्या गर्जेंच्या पिढ्यानपिढ्यानी इतिहासानी नोंद घ्यावी असे काम केले. नागझरी मोराळा हि वंजारी राजाची शौर्यभूमी आहे या भूमीने देशासाठी पराक्रमाची तळपती तलवार गाजविणारे शूर योध्दे दिले.नागझरीच्या या इतिहासाने* *वंजारी समाजाच्या पराक्रमाची,कायद्याच्या राज्याचा,न्यायदानाचा मोठा इतिहास यानिमित्ताने आपल्यासमोर का आणला गेला नाही? याची खंत कुणालाच नाही. पराक्रमी राजाची ही शौर्यभूमी मला विकासापासून दुर्लक्षितच राहिलीली दिसली.या राजधानीच्या गावात जाण्यासाठी अजूनही नीट रस्ता नाही.* *नागझरी ऊर्फ मोराळा गावचा विकास तसेच नागझरी येथील किल्ल्यांचा पुरातत्व खात्याने संवर्धन व विकास करावा.बागोजीराजेंची भव्य अशी आकर्षक दगडी छत्रीची समाधीजवळ सुशोभिकरण व्हावे असे मनोमन वाटते. हा किल्ला व समाध्या शौर्यांच्या व न्यायाच्या इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.अशी माझी धारणा आहे.*
*वंजारी राजे गर्जे घराण्याचे कुलदैवत नागनाथ आहे.किल्ल्यापासून ५-६ कि.मी. वरच गावाजवळ लहान तळे आहे. या गावाला नागतळे हे नांव पडले. या मंदिरात नागदेवता आहे. मुर्तीवर शके १७०४ चा ताम्रपटात शिलालेख आहे. व त्यावर बागोजी धर्माजी प्रतापराव राजेंचा स्पष्ट उल्लेख आहे. सोबतच्या फोटोत दिलेला निजाम* *व ब्रिटीश कालीन बिल्ला पहा त्यावर बागोजी प्रतापराव व संवस्थान नागझरी हा उल्लेख हाच उल्लेख आहे व सर्व ऐतिहासिक वस्तूजन्य पुरावे व गॅझेटच्या नोंदी आहेत. तसेच भगवान गड संस्थानच्या ग्रंथात व इतर ग्रंथात देखील धर्माजी प्रतापराव गर्जे असाच उल्लेख आहे. बीडच्या डॉ.भिमराव पिंगळे लिखीत ‘काळोखातील मशाली’ या पुस्तकातून सर्वप्रथम या* *राजेंच्या इतिहासाला न्याय देण्यात आला .आपण हे ग्रंथ अवश्य वाचावे अशी माझी आपणास विनंती आहे.राजस्थानातील वंशावलीकारांच्या (भाटांच्या) अभिलेखात देखील बागोजीपासून भुजंगरावांपर्यंत सर्वांच्या नावापुढे छत्रपती* *शिवाजी महाराजांनी दिलेली पदवी ‘प्रतापराव ‘ हे नाव वापरले जाते.याच वंशातील गोविंदराव गर्जे पाथर्डीत स्थलांतरीत झाले.त्यांना गाडगे आमराईपासून शेवगाव रोडवरील खेर्डे फाट्यापर्यंत १२०० एकर जमीन होती.त्याची मोठी व आकर्षक गढी पाथर्डी शहरातील जुने गाव असलेल्या कसब्यात होती. त्यांचे चिरंजीव जगदीश प्रतापराव* *यांनीदेखील पुर्वजांप्रमाणेच पाटीलकी सांभाळली. त्यांच्या पत्नी आप्रूगाबाई या अतिशय गुणवान व करारी बाणा असलेल्या होत्या.त्यांनी याकामी जगदीशराजेंना मदत केली.त्यांचे दत्तकपुत्र चंद्रकांत बाबा गर्जे यांनी अनेकांना जमिनी दान* *दिल्या. गढीत न्यायनिवाड्याचे काम देखील चाले.तसेच अपराध्यांना सजा दिलेल्या आम्ही पाहिले असल्याचे जुनी मंडळी आजही सांगतात. पाथर्डी तालुक्यातील निपाणी जळगाव या गावी स्थलांतरित झालेले नागझरीच्या राजेंचे वंशज सदुबा गर्जेंनी आपल्या बाप जाद्याच्या* *विरासतीप्रमाणे पाटीलकी सांभाळली.तसेच पाथर्डी तालुक्यातील अकोला व मोहोज देवढे येथेही नागझरी संस्थानच्या गर्जे राजेंच्या वंशजांनी पाटीलक्या सांभाळल्या.*
*पाथर्डीला आल्यानंतर संध्याकाळी याच गर्जे घराण्यातील नाथनगरमधील श्रीमती हौसाबाई भारतराव गर्जे यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी अगदी मायेने विचारपूस करित त्यांचे सासरे,आजे सासरे यांचा न्यायदानाचा व पाटीलकीच्या काळातील अनेक मजेदार व तितकेच संवेदनशील किस्से सांगितले.नागझरीच्या किल्ल्यात* *त्या १०-१२ वर्ष राहिल्या.तिथली खडानखडा माहिती त्यांनी सांगितली.तसेच आमच्या संपुर्ण पिढ्यांत गोशा पद्धत होती असे आवर्जून सांगितले.किल्ल्यातील महिलांना हातात बांगड्या भरायच्या असल्या तर कासार भिंतीतील देवळीतून आलेल्या हातात बांगड्या भरे.इतकी कडक गोशा पद्धत होती.बागोंजीराजेंच्या* *खानदानातली मी पण एक सुन म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर तेज दिसत होते.गाडगे आमराईत फोटोत दिसत असलेली जगदीशराजे यांचे वडील गोविंदराव प्रतापराव यांची समाधी आहे.*
*इतर समाजाला आपल्या राजाबद्दल व आपल्या इतिहासाबद्दल जसा अभिमान वाटतो तसा आपल्या वंजारी समाजाने देखील आपल्या राजाच्या शौर्य व पराक्रमाबद्दल* *अभिमान बाळगायला हवा.*
*ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे, तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजकारभार चालवतो. धनगर समाज अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अहिल्याबाई होळकर यांच्या चरणी त्यांच्या कार्याला नतमस्तक* *होण्यासाठी एकत्र येतो. किल्ले रायगडावर देखील छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी हिंदू धर्मीय, मुस्लीम धर्मीय व इतर समाज येतोच पण या राज्यातील बहूसंख्य मराठा समाज देखील मोठ्या प्रमाणावर येतो. नवीन वर्ष सुरू होतांना दरवर्षी १ जानेवारीला दलित बांधव भिमा कोरेगाव येथे* *शौर्यस्थळाला भेट देण्यासाठी प्रचंड संख्येने येत या महान योद्ध्यांविषयी अभिमान बाळगतात तर आजही आदिवासी समाज दसऱ्याला त्यांच्या राजाचं पूजन करतात.यानिमित्ताने या योद्ध्यांची आठवण जिवंत करताता. ज्या ब्रिटिशांनी* *जगावर राज्य केले ते ब्रिटिश लोक देखील त्यांच्या राजाबद्दल आजही अभिमान बाळगतात म्हणजेच जगामध्ये इंग्रजापासून तर आदिवासी समाजापर्यंत सर्वच आपल्या राजाच्या शौर्य व पराक्रमाचा अभिमान बाळगतात व त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन अभिमानाचा जल्लोष करतात. एकमेव वंजारी समाज असा* *वाटला की त्याला आपल्या राजाच्या महान शौर्य व पराक्रमाबद्दल उदासिनता आहे.आणि हे समाजाच्या दुबळेपणाचं लक्षण आहे. असे मी मानतो. बहुजनांच्या इतिहासात वंजारी समाजाचे फार मोठे योगदान आहे. तो इतिहासही अधिकाधिक* *पुढे येवो आणि उर्वरीत समाजघटकांनाही त्याची जाण येवो हीच या लेखानिमित्त माझी अपेक्षा आहे.....*
*वंजारी समाजाच्या ज्वलंत व शौर्याच्या या जळजळीत इतिहासाला अडगळीत टाकल जातय का ? अपुरी आणि वरवरची माहीती इतिहास म्हणुन खपविली जातेय का ? खुप खोलात जावुन संशोधन आजपर्यंत का झालेले नाही ? याची खात्री यानिमित्ताने झाली* . *देशोदेशी भटकंती करणारा व वंजारी समाज हा समाजधुरिणांनी 'भटका' या बिरुदाने बाजूला टाकला व काळाच्या ओघात आपली मुळ ओळख विसरून एक उपेक्षित समाज म्हणून पुढे चालत गेला व आजही उपेक्षित राहिला हे सत्य तुम्हाला व मला* *स्विकारावेच लागणार आहे. समाधी व किल्ल्याकडे ना कधी लोकप्रतिनिधींचे लक्ष गेले ना पुरातत्व विभागाचे. ना वंजारी समाजाच्या राज्यातील मोठमोठ्या पुढाऱ्यांचे,ना वंजारी समाजातील आय.ए.एस,आय.पी.एस अधिकाऱ्यांचे,ना नामवंत* *किर्तनकारांचे.ना वैचारिक धुरिणांचे... आतातरी समाज या इतिहासाच्या पाऊलखुणांचे संवर्धन करण्यासाठी लक्ष देईल का? अशी अपेक्षा बागोजी प्रतापराव गर्जेंचे वंशज नागनाथराजे गर्जे यांनी व्यक्त केली.पूर्वजांनी इतिहास घडवला* *त्याचे नुसते गोडवे गाऊन चालत नाही पण तो ऐतिहासिक वारसा जपण आता आपली जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाला जाणीव हवी. ‘‘जे इतिहास विसरतात, ते इतिहास निर्माण करू शकत नाही.’’ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा एक अतिशय* *महत्त्वाचा संदेश भारतातील जनतेला फार आधीच दिला होता.पण सर्वांनीच या संदेश अमलात आणलेला दिसत नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून याच लढ्यातील बागोजीराजे (दुसरे) यांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा* *देण्याचा मी प्रयत्न केला.परंतु मी दिलेल्या वंजारी समाजाच्या इतिहासाच्या शौर्याचा आवाज कोणाकोणापर्यंत पोहचेल हा खरा प्रश्न आहे...*
*देशासाठी पराक्रमाची तळपती तलवार रणांगणावर गाजविणा-या आपल्या शूर पूर्वजांच्या शौर्य व पराक्रमाच्या इतिहासाच उदात्तीकरण करण्याच तसेच शासन दरबारी न्याय भूमिकेसाठी अहोरात्र ध्यास घेतलेले राजे बागोजी व धर्माजी प्रतापराव गर्जे यांचे वंशज* *नागनाथराजे गर्जे यांचे कार्य ध्येयाने चालले आहे खरतर समाजाने देखील कुबट मानसिकता न दाखवता आपल्या इतक्या महान शूर राजांच्या इतिहास कार्यावर काम करणा-या* *नागनाथ राजे गर्जे सारख्या राजांच्या वंशाजाना या कामी पूर्ण ताकद दिली पाहिजे व समाजाने व समाजातील नेत्याने हा आपल्या राजांचा अभिमानाचा इतिहास डोक्यावर घेतला पाहिजे कारण त्यामुळे समाजाची शान निश्चीतच* *वाढणार, तुमचा समाज कितीही आर्थिक संपन्न असू द्या समाजात कितीही आय. ए.एस. व आय.पी. एस.अधिकारी असू द्या कितीही उद्योगपती असू द्या परंतू समाजाला इतिहास जर नसेल तर तो समाज तुटका किंवा कमजोर समजला जातो येथे हे ध्यानात ठेवा. म्हणूनच महामानव डाॅ.* *बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "जो समाज आपला इतिहास जाणू शकत नाही तो समाज इतिहास घडू शकत नाही" असो वंजारी समाजाने काय ठरवायचे ते ठरवू द्या परंतू आमच्या सारखे देशभक्तीचा ज्वर चढलेले इतर जाती धर्मातील देशभक्त म्हणून* *निश्चीतच देशासाठी लढलेल्या व बलिदान दिलेल्या या नागझरीच्या शूर गर्जे राजेंचा व योद्ध्यांचा शौर्य व पराक्रमाचा इतिहास उकळून पिणार व त्या राजांचे वंशजांना या कार्यात निश्चीतच या इतिहासाला ऊर्जीतावस्था देण्यासाठी पाठिंबा व सहकार्य राहिल.कारण देशभक्तांचा जाज्वल्य इतिहास पुढे येण्यासाठी कोणी संघर्ष करत असेल तर त्याच्या कार्यात धावून* *जाणे ही आम्ही देशभक्ती समजतो.*
*मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष चालू आहे, परंतू लोक कोट्यावधी रूपयाचे सप्ताह घालण्यात दंग आहेत . परंतू पारतंत्र्याच्या काळात जुलमी व आसुरी सत्तेचे आसुडाचे फटके मारले जात असताना जे पराक्रमी योध्दे गरिब जनतेसाठी बाहुबली* *म्हणून पुढे आले व जुलमी सत्तेविरूद्ध संघर्ष केला त्या शूर योद्ध्यांच लोकांना व समाजाला मात्र विसर पडलेला आहे*
*मी माझ्या भावना मांडल्या काही शब्द इकडे तिकडे झाले असतील तर क्षमस्व* 🙏
*आपला -जावेद मनियार,जिल्हाधिकारी कार्यालय,नागपूर* *९९७५२७३८७३*
Comments
Post a Comment